Binaka Geetmala - Ek Athwan |बिनाका गीतमाला - एक आठवण

Binaka Geetmala - Ek Athwan |बिनाका गीतमाला - एक आठवण
बिनाका गीतमालेशी अनेक पिढ्यांचे बंध जोडले गेले आहेत. बिनाका गीतमाला आणि श्रीलंका रेडिओ हे संगीतमय समीकरण नादावणारे ठरले. सुमधूर गीते प्रतिभावंत संगीतकार – गीतकारांकडून तयार होत होती, या मधुर गीतांचा तयार होत होती, या मधुर गीतांचा तालावर रसिक श्रोते डोलत होते. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाने जणू माधुर्याची स्पर्धच सुरू होती. तोच मधुर नाद पद्माकर पाठकजी घेऊन आले आहेत. आठवणींचे पदर अलगद उलगडत ते रसिक श्रोत्यांना भेट सुवर्णयुगात घेऊन जातात.त्या-त्या वर्षात सर्वाधिक लोकप्रियता मिळविणाऱ्या गीतांबरोबर भेट घडवितात. हा केवळ इतिहास नाही. अनेक पिढ्यांच्या भावजीवनाचा आलेख आहे. संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाचे मोल मोठे आहे. पाठकजी यांची प्रवाही लेखणी वाचकांवर जादू करते. बिनाकाचे सर्वेसर्वा अमीन सयानी यांचे अंतरंगही या पुस्तकातून समजते.