Bindunadkalatit | बिन्दुनादकलातीत

Mahesh Elkunchwar | महेश एलकुंचवार
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Bindunadkalatit ( बिन्दुनादकलातीत ) by Mahesh Elkunchwar ( महेश एलकुंचवार )

Bindunadkalatit | बिन्दुनादकलातीत

About The Book
Book Details
Book Reviews

बिन्दुनादकलातीत हा महेश एलकुंचवार यांचा मौनराग आणि त्रिबंध या दोन ललित लेखसंग्रहांनंतरचा तिसरा ललितलेख संग्रह. या दोन्हींशी नातं सांगतानाच त्यापुढच्या अपार शक्यता धुंडाळणारा. बिन्दुनादकलातीत हे सर्जकाने सैतानाच्या अनुषंगाने, मानववंशाशी साधलेले नव- रचित, महाकथन आहे, जिथे अनेक भ्रमांबद्दल बोलताना प्रकाश टाकला जातो तो निसर्गतत्त्वाच्या सायुज्याने गवसलेल्या परमसत्यावर! बहुमितीय अवकाशात घडलेला कलावंताचा व्योमातीताकडचा प्रवास यात सूचित केला आहे, ज्यात काल-चौकट वितळून जाते. लौकिक दृष्ट्या विविध कालखंडांत जगलेली अवतीभवतीची माणसं, संत, तत्त्वज्ञ, प्रज्ञावंत-कलावंत यांना कालबंधन नसलेल्या अतिभौतिकीय अवकाशात प्रस्थापित करून, त्यांच्यातील संवादाचा साक्षात प्रत्यय देणाऱ्या किमयागाराचा हा अलौकिक खेळ आहे. सृष्टीतील निरागसतेला उद्‌गार देणाऱ्या गवाक्षातून, वैश्विक संस्कृतीच्या महाद्वारापर्यंत नेणारी, चिरंतन वास्तवाच्या शोधात घडणारी कलासिद्धिच्या मार्गावरची ही जादुई यात्रा आहे. ज्यात विश्ववात्सल्याबरोबरच, निरोपाच्या कड्यावर वत्सल प्रकाशात उमलत असलेल्या शहाण्या विसर्जनाची वाट गवसते. मौनराग, त्रिबंध, बिन्दुनादकलातीत ही लौकिक अलौकिक-पारलौकिक यांना गवसणी घालणारी त्रयी आहे. - संजय आर्वीकर

ISBN: 978-9-35-079082-3
Author Name: Mahesh Elkunchwar | महेश एलकुंचवार
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 105
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products