Bitter Chocolate | बिटर चॉकलेट

Bitter Chocolate | बिटर चॉकलेट
भारतातील मुलांच्या लैगिक शोषणाच्या विदारक कथा. लहान मुलांना काही वेळा दोन प्रकारच्या मृत्यूंना सामोरे जावे लागतं. एक खरा मृत्यू. आणि दुसरा, नंतर ती मुलं मोठी झाल्यानंतर लोक बघतात तो मृत्यू. एक पुरूष आपले बोट उचलतो, शरीराचा एखादा भाग वापरतो, एखादी बाटली घेतो आणि एखाद्या लहान मुलग्यावर किंवा मुलीवर आक्रमण करतो. एक पुरूष. एक मूल. मग आणखी पुरूष. आणि आणखी बरीच मुलं. भारतातील मुलांच्या लैंगिक शोषणाच्या विदारक कहाण्यांचं हे पुस्तक. लहान मुलांविषयीचं. पण मोठ्यांसाठी. पालक शिक्षक, न्यायव्यवस्था, पोलिस अशा समाजातल्या विविध घटकांनी ज्यावर गंभीरपणे विचार करायला हवा असं पुस्तक. इंग्लिशमधल्या या पुस्तकाला भारत सरकारचा स्त्री शक्ती पुरस्कार मिळाला आहे.