Blotting Paper | ब्लॉटिंग पेपर

Swati Chandorkar | स्वाती चांदोरकर
Regular price Rs. 297.00
Sale price Rs. 297.00 Regular price Rs. 330.00
Unit price
Blotting Paper ( ब्लॉटिंग पेपर ) by Swati Chandorkar ( स्वाती चांदोरकर )

Blotting Paper | ब्लॉटिंग पेपर

About The Book
Book Details
Book Reviews

जेव्हा मनरूपी शेतात रुजतं तेव्हा मग उगवतात अंकुर...त्या अंकुरांना मग कुठलाही आकृतिबंध चालतो...लेख, कविता, पत्र, व्यक्तिचित्र...याच आकृतिबंधांतून स्वाती चांदोरकर व्यक्त झाल्यात मुक्तपणे...नातीला बडबडगीतं ऐकवताना त्यांना बडबडगीतांबाबत सुचतो एक वेगळाच विचार...मृत्यूबाबतही त्या करतात चिंतन... माणसाचं जीवन आणि मन...भावनांनी-विचारांनी व्यापलेलं...व्यक्तींनी गजबजलेलं...नात्यांनी बांधलेलं...साहित्यादी कलांनी रसरसलेलं...हे व्यापणं, गजबजणं, बांधणं, रसरसणं कधी रमतात शान्ताबाईंच्या कवितांमध्ये...तर कधी रमतात अरुण दातेंच्या आठवणींमध्ये...पतीबरोबरच्या आत्मीयतेने पत्र लिहितात त्या... स्वातीताईंच्या या सगळ्याच लेखनाला चिंतनाची डूब आहे आणि भावनेचा ओलावाही सहजीवनात काय कमावलं-गमावलं हे सांगताना पतीच्या आणि स्वत:च्याही व्यक्तिमत्त्वाबाबत बोलून जातात सहजपणे...कृष्णाच्याही अंतरंगात डोकवावंसं वाटतं त्यांना...चंद्रमोहन यांच्या पुस्तकाबद्दलही भरभरून बोलावंसं वाटतं...सुनील मेहतांना...एक लय साधली आहे त्यांनी या लेखनातून...ती लय वाचकांना गुंतवून ठेवेल, अंतर्मुख करेल आणि परमानंद देईल हे नक्की.

ISBN: 978-9-35-720074-5
Author Name: Swati Chandorkar | स्वाती चांदोरकर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 178
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products