Boarding Party | बोर्डिंग पार्टी

Boarding Party | बोर्डिंग पार्टी
दुसर्या महायुद्धाच्या काळात पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असलेला गोवा हा तटस्थ होता. त्यामुळे येथील बंदरात काही जर्मन आणि इटालियन मालवाहू जहाजांनी आश्रय घेतला. यातल्या एका जहाजावरून ब्रिटिश मालवाहू जहाजांचे तपशील जर्मन पाणबुडांना पोहचवले जात होते. त्यामुळे जर्मनीला ब्रिटिश जहाजांचा ठावठिकाणा लागून त्यांना जलसमाधी दिली जात होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागला तेव्हा कलकत्त्यातल्या नागरी संरक्षण संघटनेकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली. काहीशा वयस्कर, युद्धाचा अनुभव नसलेल्या या संघटनेच्या सभासदांनी या जहाजांविरुद्ध कारवाई करून ती नष्ट केली. त्याची ही थरारक कहाणी.