Bolgappa | बोलगप्पा

Bolgappa | बोलगप्पा
गप्पांना विषयाचे बंधन नसतं. अड्डा जमला की मजेशीर गोष्टींची चौफेर आतषबाजी होते. मनुष्यस्वभावाची गंमत म्हणजे जे मत काहीजणांना भावतं ते काहींना चावतं.मग, शुचिर्भूतपणासाठी अंघोळ सकाळीच का करायची, फक्त संध्याकाळी केली तर काय झालं या आधुनिक कन्येच्या सवालावर वायुद्ध जुंपतं.सोपा चार आकडी बॅंक अकाउंट नंबर तडकाफडकी पंधरा आकडी झाल्यामुळे ग्राहक सेवा सुधारली की ग्राहकराजा भांबावून गेला यावर खडाजंगी उडते.सून तयार आमटीचे आणि भाजीचे प्रत्येकी सात डबे सोमवारी मागवून आठवडा निभावते ते योग्य की चूक यावर मतभिन्नता होते.आचार-विचारातील विसंगती तर मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच, अश्रद्ध महाभाग धार्मिक प्रथांची टर उडवतात, पण न्यूमरॉलॉजिस्टच्या सल्यानुसार आपल्या नावात बदल करतात. सेवानिवृत्तीनंतर निवांतपणे राहाणार म्हणतात, पण देशोदेशींच्या धावपळत्या सहलींना जाऊन टिकमार्क टूरिझम साजरा करतात.अत्याधुनिक देश खुल्या व्यवस्थेची पाठराखण करतात, पण तिथले नागरिक दारावर नेमप्लेट लावणं टाळून गुप्तता राखतात. वैयक्तिक स्वच्छतेचा अतिरेक करतात, पण आठवडाभराचे पारोसे कपडे इमारतीमधील सार्वजनिक वॉशिंग मशीनमध्ये घालतात.अशाच चुरचुरीत विषयांवरच्या या खमंग 'बोलगप्पा'.