Born to Win | बॉर्न टू विन

Born to Win | बॉर्न टू विन
व्यवसायात यश मिळवायचं आहे? कार्यक्षेत्रात अग्रस्थान पटकवायचं आहे? कौटुंबिक आयुष्यात समाधान आणि सुख हवं आहे? मग असं समजा की, या साऱ्याची गुरुकिल्ली तुम्हाला मिळालीच... अर्थात बॉर्न टु विन! लाईफ चेंजर अशी ख्याती असणारे प्रेरक वक्ते झिग झिगलर यांनी या पुस्तकात यशाचा जणू मूलमंत्रच दिला आहे. आपल्या व्यक्तिमत्वात लपलेले अनेक गुण हे पुस्तक दाखवून देतं. "जिंकण्यासाठी वृत्ती कशी विकसित करावी? आणि वैयक्तिक विकासासाठी तिचा उपयोग कसा करावा? स्वत:च्या वर्तणुकीत बदल करून व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक निरोगी कसे बनवावे? प्रभावी संवादाचं तंत्र अवगत करून प्रत्येकाला कौटुंबिक व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे कशा निभावता येतील? या सर्वाचं मार्गदर्शन झिगलर अनेक उदाहरणं देत करतात. सोबत आकृत्या तक्ते टेबल्स यांचा आधारही ते देतात." आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर वाचलंच पाहिजे असं पुस्तक...बॉर्न टु विन !