Brand Factory | ब्रँड फॅक्टरी

Brand Factory | ब्रँड फॅक्टरी
लेखक मनोहर सोनावणे यांच्या कथांच्या केंद्रस्थानी माणूस आहे. जागतिकीकरणामुळे भारताच्या सांस्कृतिक भावजीवनाला कीड लागली गेली आहे असे त्यांचे मत आहे. देशभर प्रचंड उलथापालथ होत असताना माणसात झालेले बदल, सतत धारेला लागलेले सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक व्यवहार ,एकीकडे जगण्याला भेटण्याची जिद्द तर दुसरीकडे हतबलता, स्वप्नांचा गाठोड खांद्यावर टाकून माणसांची अंतहीन वणवण ,श्रेयस - प्रेयस यांच्यातला झगडा असा एक मोठा पट सोनवणे वाचकांसमोर मांडतात. सोनवणे यांच्या लिखाणात प्रचारकी थिल्लरपणा नाही. ते तटस्थ आहेत आणि संवेदनशीलही. त्यामुळे 'ब्रँड फॅक्टरी' ला कलात्मक मूल्य प्राप्त झालाय यात शंका नाही.