Cancer : Maza Sangati | कॅन्सर : माझा सांगाती

Cancer : Maza Sangati | कॅन्सर : माझा सांगाती
लेखकाच्या नजरेतून ... '२ जानेवारी १९८९ ह्या दिवशी , मला जठराचा कॅन्सर झाला आहे, असा बायॉप्सीचा रिपोर्ट आला. अस्थीचा कॅन्सर झालेल्या रुग्णांशी माझा रोजचा संबंध ... पण दुसर्याला झालेल्या कॅन्सरवर उपचार करणं आणि स्वत:ला झालेल्या कॅन्सरला सामोरं जाणं ह्या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत ...अथांग समुद्रात जहाज फुटल्यानं एकाकी तरंगत असलेला माणूस जे मिळेल त्याचा आधार घेऊन प्रथम जिवंत राहण्याची कोशीस करतो, तसे सुरवातीला ह्या जीवघेण्या व्याधीपासून सुटका करून घेण्याचेच माझे प्रयत्न होते. त्याकरता मी प्रथम अॅलोपथी, आणि तिच्या मर्यादा लक्षात आल्यावर ... जे काही वैद्यकीय दृष्ट्या मला उपलब्ध होत गेलं ते सर्व मी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला. हे करत असतांना केवळ जिवंत राहणं यापेक्षा जीवनाला काही वेगळा आणि महत्वाचा अर्थ असतो ह्याची मला जाणीव झाली ... माझी जीवनदृष्टीच बदलली. माझ्या जीवनाचा हेतू बदलला. तो अधिक अर्थपूर्ण व विकसित होतो आहे, अशी आता माझी धारणा झाली आहे.... हे घडवण्यास मला मदत केली ... त्या मला झालेल्या कॅन्सर ह्या व्याधीलाही मी धन्यवाद देतो. कारण तिच्यामुळं मला मृत्युचं इतक्या जवळून दर्शन घडलं आणि जीवनाचं खरं महत्व व खरं प्रयोजन समजलं. '