Captain Vikram Batra | कॅप्टन विक्रम बत्रा

Captain Vikram Batra | कॅप्टन विक्रम बत्रा
सैनिक होण्यासाठी मनातून इच्छा लागते. धाडस आणि देशभक्त हे महत्त्वाचे गूण असले तरच आपल्या मरणाला न घाबरता ती व्यक्ती सैनिक होऊ शकते . शत्रूंची गोळी कोणत्याही क्षणी आपल्या छातीचा वेध घेऊ शकते हे माहिती असून सैनिक देशासाठी जीवावर उदार होऊन लढतो. आपला हिरो कॅप्टन विक्रम बत्रा असाच सैनिक होता. हाडाचा सैनिक होता. धाडसाशी त्याची घट्ट मैत्री होती. देशभक्ती तर रक्ताच्या प्रत्येक थेंबात पुरेपुर भरलेली होती. कारगीलच्या रणांगणावर विक्रम बत्राने भारतीयांना अभीमान वाटेल असा पराक्रम केला. विक्रम कसा होता? त्याच्यावर संस्कार कसे होते? तो सैनिक म्हणून कसा होता हे तुम्ही वाचा पुस्तकात.