Chahul Udyachi | चाहूल उद्याची

Chahul Udyachi | चाहूल उद्याची
सुबोध जावडेकरांच्या विज्ञानकथांमध्ये फोकस विज्ञानावर नसतो; विज्ञानामुळे बदलत चाललेल्या माणसा-माणसांतल्या नातेसंबंधांवर असतो.समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणारं औषध निघालं तर ... एखाद्याच्या स्मृतीतली विशिष्ट आठवणच तेवढी पुसून टाकायचं तंत्रज्ञान आलं तर शत्रुराष्ट्राचे सगळे कंप्युटर्स हॅक करून युद्ध न करताच त्या देशावर ताबा मिळवता आला तर ... अशा शक्यतांचा वेध जावडेकर आपल्या कथांमधून घेतात.या संग्रहात सगळ्याच कथा काही विज्ञानकथा नाहीत; नर्मविनोदी शैलीतल्या, औद्योगिक विश्वात घडणाऱ्या कथाही आहेत. पण इथेसुद्धा त्यांची लेखणी कॉर्पोरेट जगातली गुंतागुंत रंगवण्यापेक्षा माणसांच्या मनांतला गुंता शोधण्यात अधिक रमते.थोडक्यात, जावडेकरांच्या कथा या 'उद्याच्या जगाची चाहूल घेणान्या असतात.