Chakachak Champoo Ani Itar Katha | चकाचक चंपू आणि इतर कथा

Chakachak Champoo Ani Itar Katha | चकाचक चंपू आणि इतर कथा
समुद्राच्या किनार्यावरची गोगलगायीने केला बसप्रवास. गोगलगायीने पाहिल्या उंच उंच इमारती आणि माणसांची-गाड्यांची गर्दी. बसप्रवासात तिला भेटला एक उंदीर...टिंबी कासवी आली रोहनच्या घरात आणि मग काय विचारता, घरात जणू चैतन्यच आलं. मग टिंबी बाबांना औषधांची आठवण करायला लागली, आईला स्वयंपाकघरात मदत करायला लागली, रोहनचे मोजे शोधून देऊ लागली आणि नीनाला अभ्यासात मदत करायला लागली... सुट्टीत मामाच्या गावी गेलेल्या साराला लागला चंपू वासराचा लळा. चंपूला मग साराने ‘ब्रश’ करायला शिकवलं, अंघोळ करायला शिकवलं, अगदी बोलायलाही शिकवलं...कथा सजल्यात चित्रांनी सुंदर... बालदोस्तांना नक्कीच आवडेल प्राण्यांच्या भावविश्वाची ही अनोखी सफर.