Chakrivadal | चक्रीवादळ

Chakrivadal | चक्रीवादळ
महा सागराच्या तळाशी झालेल्या धरणीकंपानं उठवलेल्या महाकाय लाटेनं केलेल्या मनुष्यहानीनं आणि घरादारांच्या विनाशानं आज सगळं जग हादरलं आहे. जगभरातले असंख्य हात आणि मदतीचा ओघ पुनर्वसनासाठी करुणेनं पुढं होत आहेत. त्याची आठवण करून देणारी, सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आंध्रच्या सागर किना-यावर घोंगावत आलेल्या राक्षसी चक्रीवादळाच्या हाहाकाराची ही विदारक कहाणी आहे. आज ’चक्रीवादळ’ या कादंबरीच्या रूपानं त्यांची ती अस्वस्थताच मूर्त होत आहे. 'चक्रीवादळ’ ही कादंबरी असूनही त्यातली वळणं रूढानं कादंबरीसारखी नाहीत. तो आहे एक वाङ्मयीन कोलाज: एकाच भयाण वास्तवाच्या असंख्य छटांचा. निर्घुण मृत्यूनं पोळलेली मनं, त्यांच्या प्राणान्तिक जखमा, तरी जगण्याचा अपरिहार्य, दुर्दम्य संघर्ष आणि या संघर्षाला सावरणारे मदतीचे उबदार हात, या सा-यांचाच( कोलाज).