Chakwachandan Ek Vanopnishad | चकवाचांदण एक वनोपनिषद

Chakwachandan Ek Vanopnishad | चकवाचांदण एक वनोपनिषद
जंगलासारख्या नित्यजागृत आणि विविधरंगरेखांनी परिपूर्ण अशा घरात राहिलेले चितमपल्ली या पुस्काच्या पानापानावर भेटतात. वनोपनिषदाचा अभ्यास आणि रानावनांमध्ये दडलेले संस्कृतीचे धुमारे त्यांनी शोधले आणि त्यापूर्वी ते ओळखले. म्हणूनच तर ते तिथलं इतकं सुंदर जीवन मनापासून जाणू शकले. मनात एक ध्यास घेऊनच ते जंगलाला सामोरं गेले. जंगलाने त्यांना रानभूल कशी घातली, त्यांचा वनवास सुखाचा कसा केला हे पुस्तक वाचताना उलगडत जातं. सहजशैलीत आणि अरण्याच्या कुशीत शिरून लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे खरोखरीचंच वनोपनिषद आहे. सारं अरण्यच एक प्राणमय जीव आहे, असं म्हणणारे चितमपल्ली अरण्यांचाच एक श्वास होऊन हे वनोपनिषद सांगताना वनर्षी बनून गेले आहेत.