Chalat Chitravyooh |चलत् चित्रव्यूह

Chalat Chitravyooh |चलत् चित्रव्यूह
अरुण खोपकर यांची ‘चित्रव्यूह’ आणि ‘चलत् चित्रव्यूह’ ही दोन्ही पुस्तके एकाच वेळी प्रसिद्ध झाली.खोपकर अनेक कलावंताना भेटले. त्याबद्दलचे लेख व व्यक्तिचित्रणे आहेत.लहानपणीच्या आठवणी, फिल्म इन्स्टिटय़ूटमधील दिवस, पंडित शरच्चंद्र आरोलकर, ऋत्विक घटक यांसारख्या दिग्गजांचा सहवास, मनिकौल, सुधीर पटवर्धन, भूपेन कक्कर अशा समकालीन आणि मैत्री असलेल्या कलावंतांचे चित्रण आणि स्थापत्यशास्त्रासारख्या विषयावर लेखन असे बरेच काही दोन्ही पुस्तकांत आहे. विलक्षण शब्दकळा, दृश्य टिपण्याची तरबेज आणि शिक्षित नजर, नर्मविनोद आणि वेगळा पोत आणि अवकाश ही या लेखनाची वैशिष्टय़े सांगता येतील. दोन्ही पुस्तकं अक्षरश: खिळवून टाकतात, पण ती अधाशासारखी वाचण्याऐवजी, कुमार गंधर्वाच्या भाषेत सांगायचे तर पुरवून पुरवून वाचली पाहिजेत.