Chalbat | चलबट
Chalbat | चलबट
ढोर समाज मानवजातीच्या इतिहासपरंपरेतला केमिकल इंजिनिअरच म्हणावा लागेल. मेलेल्या जनावराच्या कच्च्या कातड्याचं चलबट काढून रंगीत कातडं तयार करताना अनेक नरकयातना भोगून, ढोरकष्ट करून, साल, हिरडा, चुना, पाणी यांच्या नैसर्गिक केमिकलमधून वेगवेगळ्या प्रक्रियेतून कातड्याला नेलं जातं. मगच कातडं कमावलं जातं. कातड्याचा धंदा घाण आणि दुर्गंधीयुक्त असल्यानं गावकुसाबाहेर तुटक आणि झाकरीत जागेतच करत असत. सवर्ण लोक तिकडे फिरकत नसत. शेती, मानवजातीसाठी आणि विज्ञानयुगातल्या मशिनरीला लागणाऱ्या चामड्याच्या वस्तूंसाठी ढोर समाजानं प्रामाणिक सेवा केली आहे. १९७२च्या दुष्काळानं समाजाचा हा व्यवसाय देशोधडीला गेला. लेखकाच्या घरात शिक्षणाचा, सांस्कृतिक जीवनाचा, परिवर्तनाचा, कलेचा कोणताच इतिहास नव्हता. अशा घरातील दारिद्र्य, निरक्षरता, अज्ञान दूर सारून परिस्थितीशी झगडत शिक्षणाचा वसा घेतला. अंधारातल्या घराला प्रकाश मिळाला. त्यामुळे सामाजिक-कौटुंबिक बदल आणि स्वतःचं जीवन पणाला लावून त्याची सोशिकता, ससेहोलपट यात उघडून दाखवली आहे. लेखकाच्या आजवरच्या सबंध पिढीमधील ही अपूर्वता आहे. समष्टीच्या पुढील पिढीसाठी हा एक आदर्श आहे.