Chanakya Neeti | चाणक्यनीति

Other | इतर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 199.00
Unit price
Chanakya Neeti ( चाणक्यनीति ) by Other ( इतर )

Chanakya Neeti | चाणक्यनीति

About The Book
Book Details
Book Reviews

कुशाग्र बुद्धी, बहुविध ज्ञान, प्रदिर्घ अनुभव यांच्या आधारावर निर्भीड विचारवंत, समर्थ अमात्य, हुशार आणि धूर्त राजकीय विचारवंतांचे आणि कृतिवीराचे उदाहरण इतिहासात क्वचितच आढळेल. पूर्वसूरींच्या विचारांची दखल घेत, स्वतःची वेगळी मते तर्कशुद्ध पद्धतीने मांडून, नवीन चाणक्यनीति व्यक्त करणारा, थोर प्राचीन भारतीय प्रज्ञावंत म्हणजे चाणक्य ऊर्फ कौटिल्य होय. भारतात त्या काळी एकटे मगध साम्राज्य विस्ताराने मोठे होते. परंतु तेही नंदराजाच्या नाकर्तेपणामुळे दुर्बल झाले होते. शेवटचा धनानंद हा धनलोभी आणि जुलमी होता. अशा स्थितीत भारतात शक्तिशाली मध्यवर्ती एकछत्री सत्ता निर्माण करणे, ही त्या काळाची गरज होती. प्रस्तुत ग्रंथात आचार्यांची संपूर्ण चाणक्यनीति विस्ताराने अन्ययार्थासह विशद करण्याचा नम्र प्रयत्न मी केला आहे. रोजच्या जीवनाच्या चक्रात तसेच मोक्षाप्रत जाऊ पाहणार्‍या मनुष्याला आचार्य आईच्या ममतेने शहाणपणाच्या व समजूतदारपणाच्या काही मौलिक सूचना करतात. मुळातच द्रष्ट्या चाणक्यांचे विचार हे अत्यंत प्रगल्भ आणि विलक्षण प्रभावी आहेत. मुख्य म्हणजे, आजच्या २१व्या शतकाच्या तिसर्‍या दशकातही चाणक्यनीति तितकीच उपयुक्त असून, व्यक्तीत आमूलाग्र परिवर्तन घडून आणणारी आहे.

ISBN: 978-8-19-509801-9
Author Name: Other | इतर
Publisher: Goel Prakashan | गोयल प्रकाशन
Translator: Dr. Kamlesh Soman ( डॉ. कमलेश सोमण )
Binding: Paperback
Pages: 304
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products