Chandanfula | चांदनफुला

Chandanfula | चांदनफुला
चांदणफुलं म्हणजे काजवे. `चांदणंफुला` हा सुमेध वडावाला यांचा कथासंग्रह आहे. पाच दीर्घकथांमध्ये वेगवेगळ्या वयातील. वेगवेगळ्या परिस्थितीतील माणसांनी जगण्यासाठी, मानाने-अभिमानाने जगत राहण्यासाठी दाखवलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. अतिसामान्य वाटणाऱ्या या व्यक्तिरेखा प्रसंगी काजव्यांसारख्या कशा स्वयंप्रकाशाने कशा तेजाळून निघतात त्यांच्या या कथा. निबिड अंधाररात्री, कुणी आपल्याला प्रकाश दाखवेल, या भरवशावर न राहता, ते क्षुद्र किडे स्वतःच प्रकाशमान होतात. ज्या झाडावर वसलेले असतात, त्यालाही ऐश्वर्यमान करून सोडतात. सामान्य आयुष्य जगणारी, पराभूत वकुबाची वाटणारी काही माणसं, जिण्याच्या दाट संकटकाळात, ‘अत्त दीप भव’ प्रेरणेने, परिस्थितीवर बाजी मारून जातात. ‘चांदणफुला’तल्या साऱ्या कथा या पराभवालाच पराभूत करणाऱ्या अतिसामान्य माणसांच्या असामान्य कथा आहेत. सुमेध वडावाला यांच्या प्रभावी शब्दकळेने जणू तेजाळून उठल्या आहेत.