Chandatun Vidnyan | छंदातून विज्ञान
Chandatun Vidnyan | छंदातून विज्ञान
`छंदातून विज्ञान` यामध्ये एकूण ६२ प्रयोगाची माहिती आहे. हवा व पाणी, प्रकाश, ऊर्जा, चुबकतत्व, विद्युत आणि इतर सहा शीर्षकाखाली वर्गीकृत केलेली आहे. हवा व पाणी यांच्या सहायाने मजेदार भिंगरी, पानी पिणारा राक्षस, चमच्याचे चक्र, जादूचे पाणी, हवेने वजन उचलणे, उष्णतेने घसरणारा पेला, पाण्याने वजन वर उचलणे इत्यादी प्रयोगाचे सचित्र वर्णन लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत केले आहे. दैवी चमत्काराच्या मागे विज्ञान कसे आहे जसे भस्म काढण्याचा प्रकार, आगपेटीच्या साहाय्याशिवाय आपोआप धूर कसा निघतो जाळ कसा तयार होतो हे `बुवांची माया` या प्रयोगात बाल वाचकांचे मन वेधून घेते.