Chanderi Aathavani |चंदेरी आठवणी

Chanderi Aathavani |चंदेरी आठवणी
हिंदी चित्रपट, त्यातील अभिनेते-अभिनेत्री, गायक-गायिका, गीतकार-संगीतकार यांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले. किंबहुना चित्रपट कला ही भारतीयांसाठी मनोरंजनाचे प्रमुख साधन ठरली. अर्थात ते चित्रपट, ते कलाकार त्यांची कला हे सारे काही प्रेक्षकांसाठी रोजच्या जीवनाचाच भाग बनून गेले. त्या नादावलेल्या जगातील कलाकारांशी साधलेला संवाद हा चंदेरी आठवणी या पुस्तकाचा विशेष लोकांना औत्सुक्य असलेल्या वलयांकीत कलाकार मंडळींशी संवाद साधणे आणि तो संवाद ओघवत्या शैलीत वाचकांसमोर मांडणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या. लेखिका तेरणीकर त्यामध्ये यशस्वी झाल्या आहेत. हृद्द संवाद डौलदार शैलीतून वाचकांसमोर देणे हे चंदेरी आठवणीचे बलस्थान. झगमगत्या हिंदी चित्रपट दुनियेतील अनेक मोठया व्यक्तींची भेट वाचकांना या पुस्तकात घडेल. ही भेट आनंददायी तर आहेच, पण त्या-त्या कलाकारांच्या यशाची, संघर्षाची, सुख-दु:खाची कहाणी सांगणारी देखील आहे.