Chandra Chavathicha | चंद्र चवथिचा

Chandra Chavathicha | चंद्र चवथिचा
पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना लेखक म .वा .धोंड म्हणतात, 'शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणे गडकर्यांच्या नाट्यप्रतिभेचा कलेकलेने विकास होत होता. परंतु चार नाटके पूर्ण करून पाचव्याचे लेखन चालू असतानाच ते कालवश झाले. चवथीचा चंद्र पंचमीला पुरा प्रकाशलाच नाही. चंद्राच्या या वर्धिष्णू कलांचा वेध घेत घेत त्यांच्या नाट्यप्रतिभेच्या संभाव्य विकासाचा काही अंदाज बांधता येतो का, हे पाहण्याचा प्रयत्न या लेखांत केला आहे. राम गणेश गडकरी यांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्यात आपणही सहभागी व्हावे या उद्देशाने, कोणीही न सांगता-मागता, केवळ आंतरिक उमाळ्यानेच, 'चंद्र चवथिचा' हा लेख लिहिला. हा लेख लिहित असतानाच गडकर्यांच्या साहित्याविषयी आपणांस काही नवे, वेगळे सांगायचे आहे हे जाणवले आणि लेखनाचा मनस्वी कंटाळा असूनही आणखीन लेख लिहिले. आता सहाही लेख ते पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत.