Chandra Jithe Ugavat Nahi |चंद्र जिथे उगवत नाही

Chandra Jithe Ugavat Nahi |चंद्र जिथे उगवत नाही
टॉलस्टॉय हा थोर तत्त्वचिंतक होता तसाच श्रेष्ठ कादंबरीकार. एका सामान्य स्त्रीच्या आयुष्यातील प्रचंड चढउतारांचे त्यातील चित्र-नियतीचे खेळ आणि मानवी मूल्ये यांचा मनोवेधक आलेख वाचकासमोर ठेवतात.वि. वा. शिरवाडकरांनी हे कथाबीज घेऊन चंद्र जिथे उगवत नाही या नाटकाची रचना केली आहे. ही फक्त रूपा आणि सतीश यांची हेलकावे सहन करणारी प्रेमकहाणी नाही तर पापपुण्याच्या कल्पनांचा पुनर्विचार करायला लावणारी, म्हटले तर नीतिकथा आहे. चमत्कारिक घटनांमुळे कुंटणखान्यात पोचलेली, त्यातून आशेचे किरण दृष्टिक्षेपात येत असताना तितक्याच चमत्कारिक घटनांमुळे पुन्हा हरवून बसणारी रूपा ही शिरवाडकरांच्या श्रेष्ठ व्यक्तिरेखांपैकी एक आहे.