Chandrakant Kulkarni Sadar Karit Ahe |चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे

Chandrakant Kulkarni Sadar Karit Ahe |चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे
कवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. "ध्वनी प्रकाश रंग रेषा यांनी" टाकावा अवकाश भारून. "प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं " मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक. "पण मग ..." दिग्दर्शकानं काय करावं ? "आरंभापासून अंतापर्यंत " प्रत्येक क्षण उजळून टाकण्याचं कसब शिकवावं. मंचावरील आणि मंचामागील "प्रत्येकाचा मित्र तत्त्वज्ञ" आणि दिशादर्शक व्हावं. हे का आणि कसं करावं ? "सांगत आहेत " मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी.