Charimera | चारीमेरा

Charimera | चारीमेरा
गेल्या पंचवीस-तीस वर्षांच्या काळात शेतीव्यवसायात टप्याटप्याने यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढत गेला. जागतिकीकरणाने गाव-खेड्यांत नवी आव्हाने निर्माण झाली. त्याचा बदलत्या समाजव्यवस्थेवर बरा वाईट परिणाम झाला. आत्मीयता आणि विश्वास यांची जागा लूटमार आणि द्वेषभावनेने घेतली. शेतीचाही अन्य मार्गाने विचार होऊ लागला. अशा खळबळजनक सामाजिक अवस्थांतरात एखादे कुटुंब शेती हाच व्यवसाय असून सुखी असते, तर काहींनी शेती विकायला काढलेली. त्यातूनच कुठेतरी सकारात्मक बाब मनात पेरली जावी हि भूमिका घेऊन लेखकांनी आपल्या प्रदीर्घ चिंतनातून कलात्मक पातळीवर या कादंबरीची निर्मिती केली आहे.