Charles Dickens | चार्ल्स डिकन्स

Charles Dickens | चार्ल्स डिकन्स
१८१२ साली इंग्लंडमध्ये जन्माला आलेल्या डिकन्सने तत्कालिन सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपले महत्त्वपूर्ण लेखन केले. घरच्या आत्यंतिक गरिबीमुळे लहानपणीच हलकीसलकी कामे करण्याची वेळ त्याच्यावर आली. त्या परिस्थितीवर कष्टपूर्वक मात करत त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले. पत्रकारितेपासून सुरुवात करत कादंबरी, कथा, कविता, नाटक अशा बहुविध साहित्यप्रकारात त्याने आपला कायमचा ठसा उमटवला. त्यावेळच्या इंग्लंडमधील बालकामगारांचे शोषण, गुन्हेगारी, दारिद्र्य, निरक्षरता, स्त्रियांची दु:स्थिती व राज्यकर्त्यांची अनास्था यांकडे त्याने आपल्या लिखाणातून सार्या जगाचे लक्ष वेधले. डिकन्सच्या या जीवनयात्रेची, त्याच्या साहित्यसेवेची, त्याच्या प्रेमजीवनाची, समग्र कहाणी प्रदीप कुलकर्णी ह्यांनी अतिशय प्रासादिक शैलीत शब्दबद्ध केली आहे.