Chashak Ani Gulab | चषक आणि गुलाब
Chashak Ani Gulab | चषक आणि गुलाब
लेखक सुभाष भेण्डे हे युरोपला गेल्यानंतर युरोपच्या प्रवासात नुसतीच चैन केली नाही किंवा नुसत्या बघ्यासारखे देश पाहिले नाहीत. त्यांच्यातला अर्थशास्त्रज्ञ, ललित लेखक आणि चौकस सुशिक्षित महाराष्ट्रीय माणूस सतत आणि सर्वत्र जागरूक होता. शक्यतोवर त्यांनी तिथले लोक पाहिले. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. त्यांच्या देशांची स्थिती, त्यांची सुखदु:खे जाणून घेतली. पुष्कळ ठिकाणी ते प्रवासी बस सोडून एकटेच स्वतंत्रपणे हिंडले. त्यामुळे 'कंडक्टेड' प्रवासी सामान्यत: जे पाहत नाहीत ते भेण्डे पाहू शकले. हे पुस्तक वाचताना वाचकही युरोप मध्ये भरारी मारून येतात.