Chattamatta | चट्टामट्टा

Chattamatta | चट्टामट्टा
चट्टामट्टा हा तसा फार जुना शब्द, वाक्प्रचार आहे. त्याच्या जोडीचा शंपालंपा म्हणजे शंकरपाळे लंपास ! आणखी एक जोडशब्द चुण्णफुण्ण म्हणजे काहीतरी चमचमीत ! चट्टामट्टा हा अर्थातच खाद्यपदार्थाशी जास्त संबंधीत आहे. जितके खाणारे जास्त तितका खाद्यपदार्थांचा लवकर फडशा पडतो, हे वेगळे सांगायला नकोच ताज्या, आवडीचे पदार्थ बघता बघता संपतात. पण जे काही उरलंसुरलं असेल, त्यात मिळेल त्या पदार्थांची भर घालून, त्याचा चट्टामट्टा करण्यात खरी मौज असते ! बघता बघता, चविष्ट पानं उलटता उलटता पुस्तकाचा वाचून फडशा पाडाल ह्याची खात्री आहे. तर मग सुरु करायचा का हा स्वादिष्ट चट्टामट्टा - प्रदीप मेहेंदळे