Chaukat Digdarshanachi |चौकट दिग्दर्शनाची

Chaukat Digdarshanachi |चौकट दिग्दर्शनाची
हे पुस्तक दिग्दर्शनाच्या अत्यंत बेसिक्सबाबत बोलणारं पुस्तक आहे. एखादं नाटक करायचं ठरवल्यापासून ते पहिल्या प्रयोगापर्यंत जातं तेव्हा काय काय गोष्टी दिग्दर्शकाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात, त्याला काय काय करावं लागतं , काय अडचणी येतात, त्यावर कसा मार्ग काढला जातो, याचं एक जिवंत चित्रच या पुस्तकातून उभं राहतं . हे पुस्तक लिहिताना सोहोनी यांनी एनएसडीच्या प्रशिक्षणाचा आधार तर घेतला आहेच पण या सगळ्याचं विवेचन करताना त्यांनी आपल्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या नाटकांचे दाखले दिले आहेत. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या प्रत्येक मताचा त्यांच्या कामात त्यांनी कसा उपयोग करून घेतला आहे, तेही लक्षात येते. नव्याने दिग्दर्शन करू पाहणाऱ्यांना यातून विचारांची एक दिशा देण्याचे सामर्थ्य नक्कीच आहे. एखाद्या पॉकेटबुक्स इतक्या मित्रत्वानं जवळ बाळगावं असं हे पुस्तक आहे .