Chaurang | चौरंग

Chaurang | चौरंग
हृषीकेश गुप्ते यांची लघुकादंबरी - चौरंग . त्यामधील हा सवांद ‘भ्रम तुला झाला, मला नाही. वेड यांना लागलं, मला नाही. पण दूषणं मात्र मला. ज्या निरोधानं गावपातळीवरची लोकप्रियता मिळवणारी कविता जन्माला घातली, तो निरोध कुणाचा होता? दादांचा? नाही. तो निरोध यांचा होता. तो निरोध सुनंदनचा होता. पुरता वेडसर माणूस होता तो. पुरता. लग्न झाल्या दिवसापासून घरात निरोधांची पाकिटं बघतीय मी. रोज घ्यायचे विकत. रोज. पण वापरला मात्र एकदाही नाही. ते निरोध तसेच पडून राहिले. कोरडे. त्यांना ना सुनंदनच्या इंद्रियाचा स्पर्श होत होता, ना माझ्यातल्या स्त्रीचा. सहा महिने कोरडे गेले. नित्यनेमाने येणारा प्रत्येक मास मला चार दिवस पूजेची फुलं काढण्यापासून रोखू लागला. असे किती दिवस घालवायचे होते मी?’