Chhatrapati Shivaji Maharaj : Charitra Ani Shikvan | छत्रपती शिवाजी महाराज : चरित्र आणि शिकवण

Chhatrapati Shivaji Maharaj : Charitra Ani Shikvan | छत्रपती शिवाजी महाराज : चरित्र आणि शिकवण
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कार्य व कारकिर्दीतून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या, शिकवण्यासारख्या आहेत. बदलती समाजव्यवस्था, विभक्त कुटुंबपद्धती, प्रथम दूरचित्रवाणी तर आता स्मार्टफोनमुळे आलेली अनावश्यक व्यस्तता व पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यांमुळे किशोर वयोगटातील मुले योग्य संस्कार व मूल्यांच्या शिक्षणापासून वंचित झाली आहेत. महाराजांच्या निर्धार, परिश्रम, चारित्र्य, देशप्रेम, नेतृत्वगुण इत्यादी गुणांची, मूल्यांची त्यांना ओळख व्हावी, जाण व्हावी व त्याद्वारे प्रेरित होऊन त्यांना चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान जीवन जगण्यास मदत व्हावी, या उद्देशाने सदर पुस्तकाची मांंडणी केली आहे.