Chhawa | छावा
Chhawa | छावा
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे.रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी ही कादंबरी !