Chiranjiv Sachin | चिरंजीव सचिन

Chiranjiv Sachin | चिरंजीव सचिन
सचिनची कारकीर्द ही क्रिकेटच्या इतिहासातलं एक महाकाव्य आहे... पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या इम्रान, अक्रम, वकार ह्या त्रिकूटाच्या वणव्याशी सचिन झुंजत होता तेव्हा मायकेल शूमाकरने त्याच्या पहिल्या फार्म्युला वन शर्यतीत भागसुद्धा घेतला नव्हता...लान्स आर्मस्ट्रॉंगने टूर द फ्रान्स शर्यतीला सुरुवातसुद्धा केलेली नव्हती... दिएगो मॅराडोना अर्जेंटिनाच्या फूटबॉल संघाचा कर्णधार होता. पीट सॅम्प्रसने तोपर्यंत एकही ग्रॅंड स्लॅम जिंकलेली नव्हती. रॉजर फेडरर हे नावसुद्धा कानावरून गेलेलं नव्हतं. ...पण सचिन तेंडुलकरसमोर काळच थिजून उभा आहे. तो आजही चॅम्पीयन आहे... क्रिकेटपटू सचिन आणि माणूस म्हणून सचिनचं व्यक्तिमत्त्व याचे हृद्य दर्शन.