Chitra Vastuvichar | चित्र वस्तुविचार

Prabhakar Barave | प्रभाकर बरवे
Regular price Rs. 716.00
Sale price Rs. 716.00 Regular price Rs. 795.00
Unit price
Chitra Vastuvichar ( चित्र वस्तुविचार ) by Prabhakar Barave ( प्रभाकर बरवे )

Chitra Vastuvichar | चित्र वस्तुविचार

About The Book
Book Details
Book Reviews

आधुनिक भारतीय चित्रकला प्रवाहातील स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली प्रस्थापित करणारे संवेदनशील मनाचे आणि विलक्षण कल्पनाशक्तीची नैसर्गिक देणगी असलेले चिंतनशील चित्रकार प्रभाकर बरवे यांचे 'चित्र-वस्तुविचार' हे नवीन पुस्तक. "१९७२-७३ नंतरच्या कालखंडात भारतीय चित्रकलेत असलेल्या 'फिगरेटीव्ह' किंवा 'एब्स्ट्रॅक्ट' या दोन प्रवाहांपेक्षा वेगळी अशी काहीशी अतिवास्तवतेकडे झुकणारी गूढतेचा स्पर्श असलेली वास्तव आणि अवास्तवाच्या उंबरठ्यावर असलेली आणि भारतीय जीवनाशी मनाशी संवाद साधणारी शैली बरवे यांनी आधुनिक भारतीय चित्रप्रवाहात प्रस्थापित केली. सर्जनशील चित्रकार असण्याबरोबरच बरवे विचारवंतही होते. आणि आपल्या चित्रविषयक विचारांच्या नोंदीही ते वेळोवेळी करून ठेवत. १९७२ ते १९९५ या तेवीस वर्षांच्या काळात त्यांनी रोजनिश्यांमधून केलेल्या नोंदी हा चित्रकलेच्या अभ्यासकांसाठी मोठाच ठेवा आहे. सभोवतालच्या वस्तूंच्या आकारांपासून स्फूर्ती घेऊन काढलेली असंख्य रेखाटने सुचलेल्या पेंटिंगविषयीच्या कल्पना मनात येणाऱ्या चित्रविषयक जाणिवा आणि वेळोवेळची आपली भावस्थिती यांच्या नोंदी या रोजनिश्यांमधून केलेल्या आढळतात. हे सगळे त्यांचे विचार 'चित्र-वस्तुविचार' या ग्रंथात एकत्रित केले आहेत. या पुस्तकात बरवे यांचे दृक्-कला या विषयावरचे चिंतनात्मक लेख आहेत अनेक मित्रांना चाहत्यांना लिहिलेली आपल्या चित्रांचे विश्लेषण करणारी पत्रे आहेत आणि बरवे यांच्या काही कविताही आहेत. आकार अवकाश रंग प्रेरणा कल्पना मूर्त-अमूर्त माध्यम संवेदना इत्यादी मूलभूत सर्जनप्रक्रियेतील घटकांवर बरव्यांनी केलेले हे लेखन हा मराठी साहित्याला नवीन असाच प्रकार आहे असे म्हणता येईल."

ISBN: 978-8-17-991980-4
Author Name: Prabhakar Barave | प्रभाकर बरवे
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 512
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products