Chitrakarmi |चित्रकर्मी

Chitrakarmi |चित्रकर्मी
चित्रपटसृष्टीतल्या काही दिग्गज कलावंतांच्या गोष्टी या पुस्तकात आहेत. यात दुर्गा खोटे, राजा परांजपे, शरद तळवलकर, गणपत पाटील, श्रीराम लागू, रमेश देव, किशोर प्रधान, राजशेखर, शशिकला, दादा कोंडके, विजू खोटे, जयश्री गडकरी, विनय आपटे, सदाशिव अम्रापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, स्मिता पाटील यांसारख्या तीस कलाकारांच्या जीवनातील संघर्ष लेखरूपात आलेला आहे. लेखक आशिष निनगुरकर यांनी या कलाकारांची कारकीर्द थोडक्यात आणि वाचनीय शब्दांत मांडली आहे. या मान्यवर कलावंतांची माहिती बारकाईने देण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे. त्यांचा मोजका पण महत्त्वपूर्ण प्रवास या पुस्तकात मांडला आहे.