Chitrapat Pravahacha Itihas : Jagtik Ani Bhartiya |चित्रपट प्रवाहांचा इतिहास : जागतिक आणि भारतीय

Chitrapat Pravahacha Itihas : Jagtik Ani Bhartiya |चित्रपट प्रवाहांचा इतिहास : जागतिक आणि भारतीय
कोणतीही कला निर्वातात आकार घेत नाही. ती घडण्यात अनेकांचा सहभाग असतो. प्रत्यक्ष कलावंतांचा तर असतोच, पण त्याबरोबरच विचारवंत, जागरूक आस्वादक यांच्याकडून आलेला प्रतिसादही कलेच्या विकासात महत्त्वाचा ठरतो. "चित्रपटांच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात अशा अनेक जागा आपल्याला सापडतील जिथे व्यवसायापलीकडे जाणारा विचार प्रबळ ठरला आणि चित्रपटांनी तसंच त्यांच्या दिग्दर्शकांनी परिचित मार्ग सोडून वेगळ्या वाटा निवडल्या." "यामागे विविध कारणं होती. कधी यात कलाविचार होता; कधी तो बदलत्या सामाजिक परिस्थितीला दिलेला प्रतिसाद होता; कधी चित्रपटांच्या परिचित आकृतिबंधाला चळवळीच्या स्वरूपात केलेला विरोध होता तर कधी इतर काही." व्यावसायिक चित्रपटांचा मुख्य प्रवाह आणि त्यातून वेळोवेळी वेगळे झालेले इतर प्रवाह यांच्या मिश्रणातून चित्रपटांच्या जडणघडणीचा इतिहास बनलेला आहे. "या लेखनप्रपंचाचा हेतू या प्रवाहांमधून चित्रपट कसा घडत गेला याकडे नजर टाकण्याचा आहे. त्याबरोबरच भारतीय चित्रपटांमधल्या प्रवाहांकडे पाहण्याचा आणि त्यांना जागतिक सिनेमातल्या घडामोडी विचार यांच्या संदर्भाची चौकट आणून देण्याचाही हा प्रयत्न आहे."