Collage Gate | कॉलेज गेट

Collage Gate | कॉलेज गेट
महाविद्यालयीन भावविश्वाचा वेध घेणारी सागर कळसाईत या तरूण लेखकाची कलाकृती! महाविद्यालयाच्या स्वच्छंदी वातावरणात तरूणाईचे विविध पैलू उलगडत जात असतात. भूतकाळातील आठवणी, भविष्याचा विचार आणि वर्तमानातील मौजमजा यांची सांगड घालताना तरूणाईची घालमेल होते. ही सांगड कशा पद्धतीने घालता येईल याची माहिती देणारी झक्कास कादंबरी. जे कॉलेज गेटच्या आत स्वच्छंदीपणे जीवन जगले, जे जगत आहेत किंवा जे जगतील त्या सर्वांसाठीच… मैत्री की प्रेम? या गुंत्यात अडकलेल्या प्रत्येक तरूणास ही कादंबरी मुक्त करेल! काही सत्य अनुभव आणि काही काल्पनिक प्रसंग यांच्या मैफलीतून ‘नाण्याची तिसरी बाजू’ असा नवीन विचार मांडला आहे. अगदी हलक्या फुलक्या शब्दांचा आणि भावनांचा शिडकावा असलेली ही कादंबरी वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते!