Collector Sahiba | कलेक्टर साहिबा

Collector Sahiba | कलेक्टर साहिबा
देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांची ॲमेझॉन बेस्टसेलर ठरलेली मूळ हिंदीतली ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, लालफीतीचा कारभार अशा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही ही कादंबरी भाष्य करते.