Con-Fusion |कन्फ्युजन

Con-Fusion |कन्फ्युजन
आम्हाला दररोज स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागते. त्यासाठी आम्हाला दररोज नवीन काहीतरी करावे लागते... लोकांनाही रोज काहीतरी नवीन हवे असते.... त्यासाठी आम्ही स्वतःला आणि दुसऱ्याला कोणत्याही पातळीवर नेऊन ठेवायला तयार असतो. प्रस्थापित मूल्ये आणि संस्कृती पायदळी तुडवायलाही तयार होतो. इतकं सगळं करूनही काहीतरी खटकतं आहे काहीतरी चुकत आहे. जुन्या आणि नव्या मूल्यांची हात मिळवणी करता करता आमचा काहीतरी गोंधळ होतो आहे... आम्हाला जून सगळंच चुकीचं ठरवायचं... त्या जुन्यातूनच काहीतरी नवीन नवीन उकरून काढून नवीन शोध लावायचेत... ते स्वतःचेच आहेत असं भासवायचंय... का? आम्ही स्वतःकाही नवीन, चांगले निर्माण करू शकत नाही म्हणून? जून सगळं चुकीचं होत आणि आम्ही नवीन निर्माण करतोय ते सगळं बरोबर आहे असा आपला अट्टाहास कशामुळे होतोय? कोण ठरवणार ते चूक कि बरोबर? आम्ही जर सगळंच बरोबर वागत आहोत, तरीही काहीतरी कन्फयुजन होतंय. पण नक्की काय आणि कुठे चुकतंय, का होतंय.... आमचं कन्फयुजन?