Dadar Ek Pinakolada | दादर एक पिनाकोलाडा

Dadar Ek Pinakolada | दादर एक पिनाकोलाडा
दादर हे निव्वळ मुंबईच्या एका विभागाचं नाव नाही. हे एक संस्कृतीचं नाव आहे. जिथल्या घराघरात इतिहास आहे. साहित्य, राजकारण, समाजकारण, नाटक, सिनेमा, संगीत, क्रीडा, फाइन आर्टस, शैक्षणिक क्षेत्र, इंजिनिअरिंग व वैद्यकशास्त्र ह्यांतली दादामंडळी इथे राहिली आणि मोठी झाली. त्यामुळे ह्या वातावरणात वाढणाऱ्या प्रत्येकावर ह्या सर्व गोष्टींचा परिणाम होतो. तो मुलगा किंवा मुलगी सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध होतात. हे पुस्तक म्हणजे लेखकावर झालेल्या सांस्कृतिक परिणामाचा परिपाक आहे. हा परिणाम संझगिरी यांनी आठवणींच्या रुपात मांडलाय. काही आठवणी हलक्याफुलक्या, काही अंतर्मुख करणाऱ्या, काही बिनधास्त, तर क्वचित एखादी आठवण डोळ्यांच्या कडा पाणावणारी... हे पुस्तक वाचता वाचता तुम्ही १९६०, ७०, ८० ते थेट २००० च्या दादरमधून कधी फिरून याल कळणार नाही.