Dahajani | दहाजणी

Dahajani | दहाजणी
या सर्व कथांतून स्त्रीमनाची स्पंदनं आपल्या प्रत्ययाला येतात. स्त्रीचा कोंडमारा, तिचा दुबळेपणा, तिची अगतिकता जाणवते. तिच्या मनाचे पदर आपल्यासमोर उलगडले जातात. स्त्री म्हणजे गाई-म्हशीसारखं मुकं जनावर. तिला मन आणि बुद्धी असते, तिलासुद्धा पुरुषासारख्या वासना असतात, असं जिथं समाज मानत नव्हता, त्या ठिकाणी स्त्रीच्या मनातील घालमेली, उलथापालथी, वाचकाच्या लक्षातही येणार नाही, अशा सहजपणे उघड करण्याचा प्रयत्न लेखकानं केला आहे. विभावरी शिरूरकरांच्या हिंदोळ्यावरमधे जगाला अपरिचित असणार्या स्त्रीमनाचं दर्शन प्रथम घडलं. त्यानंतर लिहिल्या गेलेल्या कथांत दहाजणी या कथासंग्रहाला बरंच वरचं स्थान द्यावं लागेल. "या संग्रहातील सर्वच कथा-म्हणजेच दहाजणी-स्त्रीच्या व्यथांच्या अनेक छटांचं दर्शन घडवतात हे खरं! ह्या सर्व कथांतून स्त्रीच्या मूक व्यथा बोलक्या झाल्या आहेत."