Dahashatichya Chheyet : Dairy Eka Kashimiri Anamikachi | दहशतीच्या छायेत : डायरी एका काश्मिरी अनामिकाची

Dahashatichya Chheyet : Dairy Eka Kashimiri Anamikachi | दहशतीच्या छायेत : डायरी एका काश्मिरी अनामिकाची
दहशतवाद्यांनी उद्धवस्त केलेल्या एका काश्मिरी घरात ही डायरी सापडली. इतिहासाची जाण, तसंच वर्तमानाचं भान ठेवून या डायरीत टिपलेली निरिक्षणं म्हणजे तिथल्या धगधगत्या वास्तवाची दाहक ओळख आहे. ही डायरी लिहिणारा मारला गेलाय, ती मिळविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने ती आपल्या मित्राकडे सुपूर्त केला, तोही अतिरेकी हल्ल्यात गोळ्याचा शिकार झाला आहे. आणि सुदैवाने धायरीवर संस्करण करून तिला पुस्तकरूप देणारे तेज धर हेही काश्मीर खोऱ्यामधून परागंदा झाले आहे.दहशदवाद निमूट सोसणारा काश्मिरी सामान्य माणूस अतिरेक्यांचा बळी ठरतो,विरोध करणारा मारला जातो,आणि जो हे दोन्ही करत नाही त्याला परागंदा व्हावं लागतं. काश्मिरी माणसाचं डायरीतून समोर येणार हे प्रातिनिधिक चित्र या पुस्तकांच्या वाचनामधून वाचकांच्या समोर येतं .