Dalavinchi Natake: Ek Antarvedh |दळवींची नाटके: एक अंतर्वेध

Dalavinchi Natake: Ek Antarvedh |दळवींची नाटके: एक अंतर्वेध
आपल्या अनुभवबीजातील नाट्यास प्रभावीपणे साकार करणाऱ्या नाट्यकारांमध्ये जयवंत दळवी यांचा समावेश होतो. १९७३ ते १९९१ पर्यंत १८ वर्षांत दळवींनी एकूण १८ नाटके लिहिली आहेत ( मालवणी सौभद्र धरून ) या प्रत्येक नाटकातून वेगवेगळ्या अनुभव विश्वास नाट्यमाध्यमातून साकार करण्याचा दळवींच्या प्रयत्न दिसतो. विविध विषयांमधील वैविध्यपूर्ण अनुभवविश्व दळवींच्या मनात चक्राकार फिरताना दिसते काही अनुभव परस्परांना स्पर्श करणारे जवळचे वाटतात. तर काही परस्पर विरुद्ध स्वरूपाचे वाटतात म्हणूनच ज्या विश्वाला दळवी हाताळतात त्याचे स्वरूप समजावून घेणे गरजेचे आहे..या साठी या पुस्तकाची मदत होते ......