Darshan |दर्शन
Darshan |दर्शन
'दर्शन' या नाट्यकृतीतील प्रमुख पात्र 'कुमार'. हा कुमार गरीब पण ,पोस्ट मॉर्डन जगातला आहे.मनात नाटक चालू असतानाच एकीकडे तो अभ्यास करतोय . नाटककार होण्याची त्याला महत्वाकांक्षा आहे सोबत बीएस्सीच्या अभ्यासाची घोकंपट्टी चालू आहे. न्यूटन,आईस्टाइनची थिअरी घोकताना तो डास मारतोय. पुनरुज्जीवनवादी आणि परिवर्तनवादी यांच्यात संघर्ष चालू आहे.. आपण यापैकी कोण व्हायचं हा पण संघर्ष त्याच्या मनात चालू आहे. कुमारला देवही भेटतो.देवाची आणि कुमारची मारामारी होते.... एका रात्रीत इतके घडते आणि 'दर्शन' निर्माण होते. एक फॅण्टास्टिक पोस्ट मॉडर्निस्ट 'दर्शन'.