Daryacha Raja Kanhoji Angre | दर्याचा राजा कान्होजी आंग्रे

Daryacha Raja Kanhoji Angre | दर्याचा राजा कान्होजी आंग्रे
महाराष्ट्राच्या काराभाराची धुरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शंभू किंवा संभाजी राजे यांनी साधारण नऊ वर्षे यांनी उत्तम प्रकारे सांभाळली. त्यांचे वधानंतर संभाजी महाराजांचे द्वितिय सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या हाती आली. ह्याच काळात हे... 'कान्होजी आंग्रे ' नावाचे उसळत्या रक्ताचे आणि परखड स्वभावाचे निष्ठावंत सरदार महाराष्ट्राच्या कारभारात उदयास आले. बालपणपासून..जन्मापासून समुद्रकिनाऱ्यावर मुरुड- जंजिऱ्याच्या किल्ल्यातून वावरून काढल्यामुळे एक दिवस ब्रम्हेंद्रस्वामी ह्या कोकणातील एका योगीपुरुषाने नुसते त्यांना बघूनच भविष्य वर्तवले की हा 'मोठा लढवय्या होईल. ह्याला राजदरबारी घेऊन जावे' आणि.. महाराणी ताराबाईंनी आणि छत्रपती राजाराम यांनी त्याला सरखेल हा किताब देऊन सरदारकी बहाल केली. त्यांचे हे कादंबरीकारुप चरित्र आहे.