Datta Sampradayacha Itihas | दत्त संप्रदायाचा इतिहास

Datta Sampradayacha Itihas | दत्त संप्रदायाचा इतिहास
लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सिद्ध झालेला हा ग्रंथ. श्री दत्त या अत्यंत लोकप्रिय आणि अद्भुत दैवताचे संशोधनात्मक दर्शन त्यांनी या पुस्तकातून घडविले आहे. पहिल्या प्रकरणात त्यांनी दशावताराचे रहस्य सांगितले आहे. दुसऱ्या प्रकरणात दत्तोपासनेचा उदय आणि विकास यावर भाष्य केले आहे. तिसऱ्या प्रकरणातून श्रीनरसिंह सरस्वती यांच्या जीवन आणि कार्याची ओळख होते. चौथ्या प्रकरणात दत्तोपासक साधू-संतांची माहिती समजते. पाचव्या प्रकरणात दत्त संप्रदायाचे स्वरूप समजते. चार प्रमुख दत्तक्षेत्रांची माहिती सातव्या प्रकरणात आणि दत्तोपासना आणि दत्तपरंपरा या संदर्भातील आणखी माहिती आठव्या प्रकरणात मिळते.