Detective Alpha Ani Kagadi Pakshyanche Gupit | डिटेक्टिव्ह अल्फा आणि कागदी पक्ष्यांचे गुपित

Sourabh Wagale | सौरभ वागळे
Regular price Rs. 288.00
Sale price Rs. 288.00 Regular price Rs. 320.00
Unit price
Detective Alpha Ani Kagadi Pakshyanche Gupit ( डिटेक्टिव्ह अल्फा आणि कागदी पक्ष्यांचे गुपित ) by Sourabh Wagale ( सौरभ वागळे )

Detective Alpha Ani Kagadi Pakshyanche Gupit | डिटेक्टिव्ह अल्फा आणि कागदी पक्ष्यांचे गुपित

About The Book
Book Details
Book Reviews

उज्ज्वल मोहपात्रा - दक्षिण मुंबईतील आमदार दिलीप ससाणे यांच्या पक्षाचा ट्रेझरर. दादरमधील एका प्रशस्त बंगल्यात तो एकटाच राहतो. एके दिवशी सकाळी मोहपात्राच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास येतं, की तो त्याच्या घरातून अचानक नाहीसा झाला आहे. बंगल्यातील अस्ताव्यस्त सामान आणि फरशीवरील आणि रक्ताचे ओघळ यावरून कोणीतरी राजकीय शत्रुत्वातून मोहपात्रावर हल्ला केला आणि त्याला उचलून नेलं, असा पोलीस निष्कर्ष काढतात. पण प्रकरणाला चमत्कारिक वळण तेव्हा लागतं, जेव्हा त्याच दिवशी सकाळी मोहपात्राच्या नावाने आलेलं एक निनावी टपाल पोलिसांच्या हाती पडतं. त्यात असतो कागदाने बनवलेला एक पक्षी ! पुढच्या तपासात पोलिसांना मोहपात्राच्या घरात असेच आणखी कागदी पक्षी सापडतात. या पक्ष्यांचा मोहपात्राच्या गायब होण्याशी काही संबंध आहे का? ते पक्षी मोहपात्राला कोण आणि का पाठवत होतं? त्यांच्यात कोणता अनाकलनीय असा अर्थ दडला आहे? जेव्हा अल्फा या प्रकरणाचा तपास सुरू करतो, तेव्हा वरवर साध्या दिसणाऱ्या या प्रकरणाचं जीवघेण्या साहसात रूपांतर होतं.

ISBN: 978-8-19-801128-2
Author Name: Sourabh Wagale | सौरभ वागळे
Publisher: Dilipraj Prakashan Pvt.Ltd. | दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 216
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products