Detective Alpha Ani Madhyaratricha Sangit | डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचं संगीत

Detective Alpha Ani Madhyaratricha Sangit | डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचं संगीत
नाशिक जिल्ह्यामध्ये काडवा नदीकाठी कुंदेवाडी नावाचं एक शांत- सुंदर खेडेगाव आहे. या गावाच्या बाहेर शेतांनी वेढलेल्या परिसरात सुप्रसिद्ध सतारवादक नानासाहेब रानडे यांचा बंगला आहे. चौऱ्याऐंशी वर्षांचे नाना आजही बंगल्याच्या आवारात खास बनवलेल्या आउटहाउसमध्ये नियमित सतारवादन करतात. या नियमाला अचानक एक अनपेक्षित वळण मिळतं. हिवाळ्यातील एका थंड रात्री त्या आउटहाउसमधून एकाएकी सतारीचे सूर ऐकू यायला लागतात आणि समस्त रानडे कुटूंबीयांची झोप उडते. ते आउटहाउससचा दरवाजा उघडून पाहतात आणि त्यांना समोर रक्त गोठवून टाकणारं दृश्य दिसतं - खोलीच्या मध्यभागी सतारीला कवटाळून निपचित पडलेला नानांचा मृतदेह ! नानांचा खून झाला, हे सिद्ध झालं आहे. आणि अल्फाला शोधून काढायचंय, ते निर्दयपणे, थंड डोक्याने खून करणाऱ्या त्या गुन्हेगाराला. कोण असेल नानांचा खुनी? त्यांच्या कुटुंबातलाच कोणीतरी ? की नानांचा एखादा अज्ञात शत्रू ? संशयितांच्या गर्दीत आणखी एक प्रश्न विकट हास्य करत अल्फासमोर उभा आहे, आणि तो म्हणजे, नानांच्या मृत्यूसमयी वाजलेल्या सतारीचं रहस्य नक्की काय आहे ?