Devbabhali |देवबाभळी

Devbabhali |देवबाभळी
भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकोबांना भाकरी द्यायला गेलेली नि काटा रूतून बेशुद्ध झालेली आवली आणि तिला लखुबाई बनून घरी घेऊन येणारी साक्षात रखुमाई यांच्यातील अनोख्या संवादातून लौकिक अलौकिक नात्याची वीण प्राजक्त देशमुख यांनी या नाटकात रेखटली आहे. देवत्व लाभलेल्या राखुमाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी या नाटकाचा केंद्रबिंदू आहे.नाटकाचं संगीत आपल्याला मंत्रमुग्ध करतं. तर सहज आणि सोपे संवाद आपल्या काळजाचा ठाव घेतात. आवली आणि राखुमाई आपल्या मैत्रिणी वाटतात, तर 'संगीत देवबाभळी' हे नाटक कायम स्मरणात ठेवावंसं वाटतं.