Dhag | धग

Dhag | धग
‘धग’ ही कादंबरी आहे एका सामान्य शिंपिणीची कहाणी. परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही गाथा.“कौतिक” ही एक सामान्य स्त्री, पण तिची झुंज असामान्य आहे. परिस्थितीपुढे ती वाकते आणि म्हणूनच कादंबरी मनाला अधिक जाऊन भिडते. कारण हा शेवट अपरिहार्य असतो. स्थितीचे अनुलंघ्य कवच फोडण्यासाठी करफोड करणारा माणूस, हाच ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. "ही कादंबरी पूर्णतः ग्रामीण वातावरणातील आहे.तिच्यातील बोली वर्हाडी आहे.प्रादेशिक कादंबरी म्हणून तिचा कुणी गौरवाने उल्लेख करतात तर प्रादेशिकता हे वास्तववादाचेच विस्तृतीकरण असल्यामुळे ते वाड्मयमूल्य होऊ शकत नाही अशीही बाजू मांडली जाते."