Dharm Maza Vegla | धर्म माझा वेगळा

Dharm Maza Vegla | धर्म माझा वेगळा
पाश्चात्त्य राज्यशास्त्रीय संकल्पनेतील 'राज्या'हून भारतीय राष्ट्राची संकल्पना व्यापक आहे. भारत हे नुसतेच एक राष्ट्र नाही, तर ज्याच्या विश्वोत्पत्तीविषयक तसेच तत्त्वज्ञानविषयक भूमिका विद्यमान काळात तत्संबंधी महत्त्व प्राप्त झालेल्या पाश्चात्त्य भूमिकांहून अतिशय भिन्न आहेत, असे एक संस्कृतीपीठ आहे. भारताच्या आध्यात्मिक परंपरांचा उगमस्रोत धर्म आहे, ज्याच्यासाठी पाश्चात्त्य चौकटीमध्ये प्रतिशब्दच नाही. मात्र दुर्दैवाने, जागतिक पटलावरील भारताच्या वाढत्या लोकप्रियतेसंबंधी जल्लोषाच्या लगबगीत त्याच्या संस्कृतीपीठात्मक अस्तित्वाचे सामिलीकरण पाश्चात्त्य वैश्विकीकरणाच्या साच्यामध्ये होत चालते आहे, ज्यामुळे त्याची वैशिष्ट्ये आणि त्याची क्षमता विरत चालली आहेत. "विचारवंत आणि तत्त्वज्ञ राजीव मल्होत्रा यांनी त्यांच्या 'धर्म माझा वेगळा: पाश्चात्त्यांच्या वैश्विकीकरणला दिलेले भारतीय 'आव्हान' या पुस्तकाद्वारे भिन्नत्वाच्या संदर्भात थेट आणि प्रामाणिक परस्पर संवादाच्या माध्यमातून आजपावेतो भारतावर रोखल्या गेलेल्या नजरेला उलट दिशा देणे आजवर निरीक्षणीय असलेल्या भारताला निरीक्षकाच्या स्थानी बसवणे आणि पाश्चात्य जगाचे धार्मिक दृष्टीकोनातून अवलोकन करणे अशा प्रकारचे आव्हान पेलले आहे. तसे करत असताना त्यांनी दोन्ही बाजूंच्या आजतागायत तपासणीच्या भिंगाखालून कधीही न गेलेल्या अशा स्वत:बद्दलच्या तसेच परस्परांबद्दलच्या समजांना आव्हान दिले आहे. विशिष्ट इतिहासकालीन साक्षात्कार हे पाश्चात्त्य पंथोपपंथांसाठी पायाभूत आहेत तर स्व-शरीराच्या माध्यमातून स्व-चे याची देही याची डोळा आकलन यावर धर्माचा भर आहे; हे त्यांनी अधोरेखित केले आहे. पाश्चात्त्य विचार आणि पाश्चात्त्य इतिहास हे जोडकामाच्या एकतेचे प्रतीक आहेत तर मूलभूत एकात्मता ही धार्मिक पारलौकिकतेची प्रेरणा आहे हेदेखील ते दाखवून देतात." "सदर पुस्तक पांडित्यपूर्ण असून पकड घेणारे आहे. संकुचित दृष्टीकोनातून केल्या जाणाऱ्या भाषांतराच्या प्रचलित पद्धतीवर त्यात टीका केली आहे आणि भिन्नतेमुळे असुरक्षित वाटून घेणाऱ्या पाश्चात्य मानसाची चिकित्सा केली आहे. तसेच धर्मांतर्गत वावरणारी अव्यवस्था सर्जनशीलतेला कशी वाव देते तर व्यवस्थेबाबतच्या काही ठरीव कल्पना पाश्चात्त्य जगाने कशा घट्ट कवटाळलेल्या असतात हेही त्यात दर्शवले आहे. वैश्विकतेबाबतच्या पाश्चात्य दाव्यांना खोडून काढत आणि बहुविध- संस्कृतींनी नटलेल्या वैश्विक दृष्टीकोनाची भलामण करत पुस्तकाचा शेवट केलेला आहे." #NAME?